उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरानजिकच्या धाराशिव लेणीत प्राचीन काळातील दोन जाते आढळून आल्याची माहिती इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांनी दिली.

उस्मानाबाद शहरानजिक पश्चिमेस बालाघाट डोंगर रांगेत इ. स. सहाव्या ते आठव्या शतकातील उत्तर वाकाटक काळातील प्राचीन लेणी आहेत.हा सात लेणींचा लेणी समूहअसून येथील लेणी क्रमांक दोन ( पार्श्वनाथ भगवान ) मुख्य लेणीजवळ पाण्याचे कुंड आहे. यालेणीजवळ प्राचीन काळातील दोनजाते आढळून आले आहेत. यालेणीमध्ये वास्तव्य करणारे साधक अथवा भिकू हे भिक्षा मागून उदर निर्वाह करत असावेत. काहीअनुयायांनी व धर्म दीक्षा देणाऱ्यालोकांनी दिलेली मदत व धान्य हे दळण्यासाठी ह्या जात्यांचा उपयोगहोत असावा. पाण्याच्या कुंडाजवलहे जाते भेटल्याने या ठिकाणी अन्न बनवण्यात येत असावे.याचभागात एखादी प्राचीन वसाहती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मतही श्री. खोचरे यांनी व्यक्त केले.

 
Top