उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरात शिवरत्न वीर जिवाजी महाले  चौक असावा असा संकल्प अखिल भारतीय जिवा सेना,  उस्मानाबाद यांनी केला होता. त्याच अनुषंगाने नीरज गॅस एजन्सी समोर शिवरत्न वीर जिवाजी महाले  चौकाचे  अनावरण मोठ्या थाटात   खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरत्न वीर जिवाजी महाले  यांच्या स्मृती दिनी  चौकाचे अनावरण झाले. फटाक्यांची आतिषबाजी, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने नाभिक बांधवामध्ये उत्साह संचारला होता.

यावेळी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू भैया राजेनिंबाळकर, नगरसेवक सोमनाथ गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, सचिव रवींद्र राऊत, संघटनेचे पदाधिकारी विशाल जगदाळे, अतुल कावरे, बाळासाहेब शेटे, गणेश आलमले, सागर पंडित, नरसिंग डोंगरे, मनोज लाडुळकर, प्रशांत लाडुळकर, धीरज गवळी, सुजित गोरे, मंगेश गोरे, समाधान यादव यांच्यासह अखिल भारतीय जिवा सेना, विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.

 
Top