तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद रोडवर असणाऱ्या राजपँलेस लाँज पाठी मागे असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये  एका फौजदाराचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला असून दुसरा पोलीस कर्मचारी  जखमी आहे . ही दुर्दवी घटना रविवारी ३० रोजी  रात्री  आठ वाजण्याचा सुमारास घडली . या घटनने शहरासह परिसरात व पोलिस दलात  एकच खळबळ असुन ही घटना अपघात की घात आहे. या बाबतीत शहरात अनेक तर्कविर्तक काढले जात आहे.

सदरील दोघे जण उस्मानाबाद पोलिस दलात कार्यरत होते. यात मृत  पोलिस उपनिरीक्षक अनिल गंगाधर किरवाडे ( वय 34 ) हे उस्मानाबाद सायबर सेल मध्ये  पोलिस काँन्सटेबल  योगेश हणमंत सूर्यवंशी ( वय 38 ) हे उस्मानाबाद येथे  पोलीस पोलिस दलात कार्यरत होते ते  गंभीर जखमी असून त्यांना सोलापूर येथे  रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात . घटना घडताच तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन, पोनि अदिनाथ काशीद यांनी घटनास्थळी भेट दिली.

यातील पोलिस उपनिरीक्षक अनिल किरवाडे यांनी  तुळजापूर नळदुर्ग येथे काम केले होते .जखमी काँन्सटेबल योगेश सुर्यवशी माञ उस्मानाबाद येथे कार्यरत होते. या प्रकरणी अकस्मात मुत्यू  म्हणून या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.


 
Top