तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील मंकावती गल्ली, साळुंके गल्ली, किसान चौक , आर्य चौक, पंढरपूरकर गल्ली, कासार गल्ली, खडकाळ गल्ली, विश्वास नगर या भागातील महिलांसाठी  मकर संक्रातिनिमित्त आयोजित  हळदी कुंकू काय॔क्रम शोशल डिस्टंस पाळुन संपन्न झाला.

 येथील सौ. प्रियंका सुनिल   रोचकरी यांच्या वतीने महिलांसाठी हळदी -कुंकाचा काय॔क्रम मंकावती गल्ली भागातील रोचकरी सभागृहात पार पडला. विशेष म्हणजे पूण॔तः सोशल डिस्टसिंग ठेवून हळदी -कुंकाचा काय॔क्रम पार पडला. महिलांना पितळेची पूजेची थाळी वाण रूपाने सौ. रोचकरी यांच्या वतीने देण्यात आली. प्रभागातील आणि शहरातील महिलांनी सहभाग नोंदविला.  यावेळी सौ. सारिका अतुल बोधले, सौ. अमृता सुदश॔न वाघमारे, सौ. अन्नपूरणा राहुल भालेकर, सौ.अरपिता अण्णासाहेब अमृतराव, सौ. रंजना महेश प्रयाग, सौ. सुनिता दिलीप रोचकरी, सौ. प्रिती शरद रोचकरी, सौ. कविता कल्याणराव साळुंके, सौ. वर्षा दत्तात्रय कदम, सौ. स्वाती शिवाजी अमृतराव, सौ. स्वाती अक्षय सुरवसे, सौ. मोना सचिन सुरवसे, सौ. उज्ज्वला अजित क्षिरसागर , सौ. चंदाराणी अण्णासाहेब अमृतराव , सौ. अपेक्षा विनीत रोचकरी, सौ. सरिता प्रदीप सुरवसे आदीसह महिला उपस्थित होत्या.  

 
Top