उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान वंदना देण्यात आली.

या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.शेख गाझी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाडा भागात शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले, विद्यापीठ नामविस्ताराची पार्श्वभूमी सविस्तरपणे सांगितली व त्यासाठी किती लोकांनी बलिदान दिले हे हि सांगितले.तसेच याप्रसंगी बोलताना डॉ.गणेश मते यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला व प्रेरणा घ्यावी असे आव्हान केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.सुबोध कांबळे, प्रा.मुझ्झकीर पठाण, प्रा इम्रान मोमीन, प्रा. अस्लम तांबोळी, प्रा निषीनंदन शिंदे, प्रा. सुप्रिया लोंढे, प्रा.डोके शिवानी, प्रा ओंकांर वाघ व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top