उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 के. टी. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाचा २८ वा विद्यापीठ नामविस्तार दिन आज दिनांक १४ जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. सुधीर एस. पांगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उप-प्राचार्यानी नामांतर लढा त्याची पार्श्व भूमी याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री. अतुलकुमार एस. अलकुंटे, रा.से.यो. उप कार्यक्रम अधिकारी श्रीमती. रुबिया एस. काझी, श्री. शिवरात्न व्ही. खरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


 
Top