उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 योगियांची माऊली श्रीसंत ज्ञानोबारायांच्या ७२५व्या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने

श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती चिंचवड पुणे यांनी सुरु केलेल्या ज्ञानदायक, सुखकारक अक्षरवारी मध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार तेहतीस ओव्यांचे गीतेच्या श्लोकांसह लिखाण कार्यात संपूर्ण भारतभर तसेच परदेशातील ही १५ हजार माऊलीभक्त सहभागी झालेले आहेत. हे सर्व भाविक ज्ञानेश्वरीचे आहे. या एक वर्षभरात संपूर्ण हस्तलिखित पारायण करीत आहेत . या अक्षर वारीमध्ये  उस्मानाबाद शहरातील १५१ भाविक  त सहभागी झाले आहेत,  अशी माहिती श्री शामराव दहिटणकर यांनी दिली.

या अक्षर वारीतून त्यांना निश्चितच कायिक, वाचिक व मानसिक तपाची अनुभूती निश्चितच प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो.

हे पारायण आपल्या पुढील पिढीसाठी एक आदर्श, परंपरा, एक अध्यात्मिक प्रेरणा म्हणून जतन करता येणार आहे. हा लिखित ग्रंथ लेखन करणा-याच्याच घरात राहणार असल्यामुळे पुढील पिढीस तो प्रेरणादायक व प्रोत्साहनपर राहिल, अशी माहिती श्री शामराव दहिटणकर यांनी दिली.

 
Top