उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील पंचायत समिती सभापती व सदस्यांना १५ व्या वित्त आयोगामध्ये स्वतंत्र १० टक्के निधीची तरतूद केल्याबद्दल महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ देवून सत्कार करत आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्यांना हक्क व अधिकार वाढवून सुधारणा करावी तसेच पंचायत समितीच्या प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणी व अन्य प्रश्न मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर महाराष्ट्र राज्य पंचायत समिती संघर्ष समितीच्या वतीने मांडण्यात आले. यावेळी पंचायत समिती संघर्ष समितीचे मुख्य प्रवर्तक तथा पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव, संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा तुळजापूर पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय शिंदे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, दौंड पंचायत समितीचे सदस्य प्रकाश नवले, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झारकर, सभापती प्रकाश नवले, सभापती शिवाजी पाटील, सभापती राहुल भापकर, बाळासाहेब जाधव बारामती, कोल्हापूर, कराड, सातारा, भोर, लातूर, गगनबावडा, पन्हाळा, सांगली, जत आदी तालुका पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.

 
Top