उस्मानाबाद / प्रतिनिधी-

घाटंग्री व गडदेवदरी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात जेतवन बुद्ध महाविहाराची उभारणी होत असुन यातील सामाजिक सभागृहास आमदार मा.कैलास  पाटील  यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतुन पंचवीस लाख रुपये निधी दिला.या सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ सोमवार दि.१७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख धम्मदेसना पु.भदंत सुमंगल (कपिल नगरी,कराळी) पु.भदंत सुमेध  नागसेन (बुद्ध लेणी खरोसा) तर बांधकामाचा शुभारंभ उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील,तसेच प्रमुख पाहुणे अस्मिता  कांबळे, अध्यक्ष,जिल्हा परिषद उस्मानाबाद, दिग्विजय  कैलास शिंदे  ,समाज कल्याण सभापती,तर प्रमुख उपस्थिती मध्ये  रणजित  शिंदे, सरपंच ग्रामपंचायत घाटंग्री, .सचिन  जाधव , उपसरपंच ग्रामपंचायत घाटंग्री, शहाबाई  कांबळे,सरपंच ग्रामपंचायत गड देवदरी, भाग्यश्री  खताळ,उपसरपंच ग्रामपंचायत गड देवदरी,अन्य इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमात चिवरदान कैलास  शिंदे  ,उमरगा हे करणार असुन भोजनदान  सुनील  धोंडीराम सोनवणे उस्मानाबाद यांच्या कडुन होणार आहे,कार्यक्रमाचे निमंत्रक  पी एम सोनटक्के   नायाब तहसीलदार यांनी केले आहे,गरज राहिल वास्तवतेची सदर हा कार्यक्रम कोव्हिड -१९ प्रतिबंधक नियमांचे पालन केले जाणार असुन हा कार्यक्रम पन्नास जणांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 
Top