उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी वाढदिवसानिमित्त हार, तुरे अथवा कोणत्याही प्रकारचे भेटवस्तू भेट न देता ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अभ्यासिका, वाचनालय, यासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले होते.

 या आवाहनाला प्रतिसाद देत मा.आमदार ज्ञानराज चौगुले यांचे वडील श्री.धोंडीराम चौगुले यांनी  ज्ञानज्योती संस्थेच्या उपक्रमासाठी 2 लाख 25 हजार, नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांच्याकडून 51,000 रु. कु. सोनाली राजेंद्र भोजने 11,000 रु. सतीश जाधव सरपंच कदेर यांच्याकडून 5000 रु., बयाजी साबणे यांच्याकडून 2100 रु.  अशा स्वरूपाचे अर्थसहाय्य आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शुभेछुक हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त केवळ पुस्तके भेट दिली.

 तसेच कोराळ शिवसेना शाखा यांच्या वतीने मानवलोक सेवाभावी संस्थेच्या *निराधार लोकांना भोजन देणे  या उपक्रमासाठी 21,000 रुपयांची देणगी देण्यात आली.यावेळी शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, शाखाप्रमुख अण्णाराव माने, किशोर सुरवसे, विलास सागर आदी उपस्थित होते.  ग्रामपंचायत कार्यालय, व्हताळ अंतर्गत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून मंजूर असलेल्या स्मशानभूमीचे भूमिपूजन, जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, तसेच शेतरस्त्याचे भूमिपूजन आदी कार्यक्रम आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, अप्पासाहेब पाटील, प्रदीप मदने, शरद पवार, काका गायकवाड, संदीपान पाटील, प्रताप मोहिते, तटामुक्ती अध्यक्ष दत्ता पाटील, डॉ.ज्ञानेश्वर साबणे, माजी उपसरपंच राजाभाऊ पाटील, नेताजी जाधव, डिगोळे साहेब,  राजाभाऊ वाघमोडे, सुमन ताई जाधव, संजय जाधव यांसह व्हनताळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top