उस्मानाबाद (प्रतिनिधी)

राज्यामध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा मांडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दोन हजार पत्रे पाठवली जात आहेत.      

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील ,आ.सुजितसिंह ठाकूर ,जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज  दिनांक ९ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथील मुख्य टपाल कचेरीतून मुख्यमंत्र्यांना निषेधाची दोन हजार पत्र पाठवण्यात येत आहेत. यासंदर्भात भूमिका विशद करताना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर म्हणाले, राज्याचे शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यातील विद्यापीठांमध्ये स्वतः साठी (प्र)कुलगुरू हे प्रथम महत्त्वाचे पद आर्थिक लाभ घेण्याच्या हेतूने निर्माण करू पाहत आहेत आणि त्या माध्यमातून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत प्र कुलगुरू हे उच्चपद बहाल करून या माध्यमातून मावेजा लाटण्यासाठी जमिनी हडप करण्यासाठी हे विधेयक सभागृहामध्ये मांडलेले आहे याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांना दहालाख पत्र पाठवले जाणार आहेत आहेत. शिक्षण उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन हि केले.

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत. या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा या काळया कायद्याला विरोध करत आहे.   विधेयकाला विरोध करण्यासाठी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,समन्वयकअभय इंगळे,अभियान संयोजक ओम  नाईकवाडी,बालाजी जाधव,देवकण्या गाडे,विशाल पाटील जिल्हासंयोजक विद्यार्थी ,कुलभूषण माने ,रोहित पाटील ,गणेश इंगळगी, सचिव सुनील पांगुडवले ,रोहित देशमुख ,प्रसाद मुंडे ,मनोज ठाकूर ,सागर दांडनाईक ,जगदीश जोशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top