उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हयाच्या वतीने मराठवाडा संघटनमंत्री संजय कोडगे व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे महत्वपुर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी झालेल्या महत्वपुर्ण बैठकीमध्ये संघटनमंत्री संजय कोडगे यांनी जिल्हयात राबविलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच ३० जानेवारी २०२२ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनतेशी संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम देखील इतर कार्यक्रमाप्रमाणे सर्व मंडलामध्ये प्रत्येक बुथवर राबविण्यात यावा, असेही संजय कोडगे यांनी सांगीतले. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्हाभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविलेल्या विविध कार्यक्रमात  पं .स. व  जि. प. सदस्य यांच्या तालुकानिहाय बैठका  नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप आणि महाआरती, काँग्रेसला सद्बुद्धी मिळो म्हणून गांधीजींची प्रार्थना, तसेच कॅडल मार्च, सावित्रीबाई फुले जयंती,  डॉ भारतीताई पवार यांचा दौरा, एसटी कर्मचारी बैठक, श्रमकार्डचे वाटप कार्यक्रम, उस्मानाबाद शहरात प्रभागनिहाय बैठका, युवा मोरच्यांच्या वतीने काळे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन व 2000 पत्र,   बुथ तेथे उद्योजक संकल्पना घेऊन 141 जणांचे प्रस्ताव d.i.c. मार्फत मंजूर,   युवा मोर्चा प्रभारी बैठक,   स्वामी विवेकानंद व माँसाहेब जिजाऊ जयंती साजरी,  अनिल परब व अदिती तटकरे याना निवेदन, इत्यादी कार्यक्रम 2022 च्या जानेवारी महिन्यात राबविले आहेत. तसेच येणाऱ्या काळातही पार्टीने दिलेले सर्व कार्यक्रम तसेच मन की बात कार्यक्रम जिल्हाभरात मोठया प्रमाणात यशस्वी करु असा शब्द नितीन काळे यांनी संघटणात्मक बैठकीत दिला.

 या बैठकीस जिल्हयातील भाजपाचे दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधिर पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.अनिल काळे, नेताजी पाटील, ॲड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, सुनिल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, अर्चना अंबुरे, अजित पिंगळे, कैलास शिंदे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, राजेंद्र पाटील, पांडूरंग लाटे, संजय पाटील, नामदेव नायकल, संजय जाधवर, ओम नाईकवाडी यांच्यासह जिल्हयातील भाजपाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top