परंडा / प्रतिनिधी :- 

जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सरगम मंगल कार्यालयात ग्राम सुरक्षा यंत्रणा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मोठ्या प्रमणात प्रतिसाद मिळाला.

     एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलचा उपयोग केला जातो मोबाईलचा वापर करून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.गावातील ग्रामस्थ या ग्रामपंचायती मध्ये गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक मोबाईल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी जवळपास सर्वच क्रमांकावर संपर्क करण्याची यंत्रणा राबवली जात आहे. त्यामुळे संकटात असणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत मिळणार आहे.याचा  वापर प्रभावीपणे होत असल्याची माहिती या संकल्पनेचे संचालक डि.के.गर्डे यांनी माहिती दिली.

       या समाज प्रबोधन कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच या कार्यकर्मास सरगम  ऊद्योग समुहाचे प्रमुख शहाबर्फीवाले यांनी कार्यालय उपलब्ध करून देऊन सहकार्य  केल्याबद्दल बाशाभाई शहाबर्फी वाले  यांचा सत्कार ग्राम सुरक्षा यंत्रणाचे नागरी सुरक्षा सेवा राज्य संचालक डि.के.गोर्डे व पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top