तुळजापूर /प्रतिनिधी -

महाराष्ट्रातील तीस टक्के सरपंचांना गावगाडा चालाविताना आपल्या जमिनी विकाव्या लागल्याचे स्पष्ट  करून  सर्वांना आमदार मग सरपंच मधुन विभागनिहाय का आमदार नाही असा सवाल करुन राज्यातील पाच विभागनिहाय सरपंचा मधुन  आमदार निवडावेत अशी मागणी सरपंच परिषदेच्या अध्यक्षा झिनत कोहीनूर सय्यद यांनी केली 

  शहरातील शासकीय विश्रामधाम येथे  पञकार परिषदेत झाली.  यावेळी  संघटक कोहीनूर सय्यद,  जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना झिनत सय्यद म्हणाल्या की, महाराष्ट्रातील सीएसआरचे सोळा हजार  कोटी रुपये  तीस टक्के रक्कम ग्रामपंचायतना भरता येने शक्य न झाल्याने कंपन्यांनी गुजरातला  दिल्याचे  स्पष्ट केले .आम्ही आजपर्यत पथदिवे वीज बिल शासनाने भरावे  यासाठी प्रयत्न केले ते यशस्वी झाले पुर्वी सरपंचाना मानधन वेळे वर मिळत नव्हते त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा केला याला ग्रामविकास मंञ्यांनी प्रतिसाद दिला.

ग्रामपंचायत अंतर्गत काही काम  करावायाची असतील अवघा तीन लाखाची मर्यादा होती ती वाढावी यासाठी पाठपुरावा केला सहकार मंञी बाळासाहेब पाटील यांनी पंधरा लाख वाढ केली. शालेय व्यवस्थापन समिती पदसिध्द अध्यक्ष सरपंच असावा पंचायत समिती मध्ये स्ञी पुरुष सरपंचाना प्रतिक्षालय सरपंच कक्ष निर्माण करावेत,  आँपरेटर नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतला द्यावेत,  आमचे मानधन ग्रामसेवक ऐवडे तरी करावी गावपातळीवर  पक्षांतर बंदी बरोबर पँनलबंदी कायदा लागु करावा यासह सरपंचाच अनेक समस्या सोडविण्या बाबतीत सरपंच परिषद काम करणार आहे.

 याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे, तुळजापूर तालुकाध्यक्ष संजय गुंजोटे,पोपट बंडगर,सावरगाव सरपंच रामेश्वर तोडकरी, आरळीचे सरपंच गोविंद पारवे,सरपंच विष्णू माळी सलगरा (दि.),मोटे राजाभाऊ सरपंच गोंधळवाडी, राजेंद्र डोलारे,पापलाल सय्यद, लक्ष्मण कचरे,प्रशांत भारती उपसरपंच वैराग,प्रकाश मगर सांगवी,राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.


 
Top