उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्या सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्ममुळे अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळत आहे.मात्र त्यासाठी आपल्याकडे वेगळेपण असायला पाहिजे तरच आपण आपलं नाव व कला जगासमोर घेऊन जाऊ शकतो असे प्रतिपादन अश्वत्थामा वेबसिरिजच्या पोस्टर अनावरण प्रसंगी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले.यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका सुमती चव्हाण,दत्तात्रय चव्हाण व विशाल पाटील हे होते. 

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, चिराऊ चव्हाण यांच्यासारखी अष्टपैलू कलाकार हीच आपल्या उस्मानाबादची खऱ्या अर्थाने देणं आहे. या वेबसिरीजला काही मदत लागली किंवा शूटिंगसाठी ठिकाण उपलब्ध होत नसतील तर अशा वेळी मी सहकार्य करायला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक कलाकारांना संधी देऊन त्यांच्या अंगी असणा-या कलेला व्यासपीठ दिल्याबद्दल ही त्यांनी अश्वत्थामाच्या टीमचे आभार मानले.

उस्मानाबाद येथील पंधरा ते वीस तरुण-तरुणींनी एकत्र येत ‘अश्वत्थामा’ ही वेबसिरीज यूट्यूबच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्याचे पोस्टर अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. ही वेब सीरीजचा ट्रेलर 1 फेब्रुवारी तर पहिला शो 4 फेब्रुवारी रोजी येणार असून याचे तीन भाग असल्याचे ही या वेबसिरीजचे दिग्दर्शक निर्माते व कलाकार चिरायू चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले.

  या वेब सिरीजसाठी चिराऊ चव्हाण, गणेश सावंत, आशिष आग्रे, सागर फुलसुंदर, प्रज्वल जगताप, विशाल चंदणे,सतीश गवंडी, वैभव वाघमारे, ओमकार जाधव,आकाश डाळिंबे,शिवा सौदागरे

धीरज चव्हाण, विश्वास तीळगुळकर,अभिषेक देगील, मोनू पवार, सारंग मुळीक अनुष्का भेंगडे, प्रतिज्ञा कदम,रिधिमा अंबुरे,सुहानी निंबाळकर, विजया गिरी हे यामध्ये कलाकार म्हणून काम करणार आहेत. या कार्यक्रमाचे आभार ओमकार जाधव  व सूत्रसंचालन अमित गुळमिरे यांनी मानले.


 
Top