उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्षीरसागरचे रविवारी तेली समाज संघटनेच्यावतीने स्वागत करून त्याच्या सायकलस्वारीचे कौतूक करण्यात आले.

देवांशू क्षीरसागर हा आठ वर्षीय सायकलपटू सोलापूर येथील रहिवाशी आहे. त्याने कळसूबाई शिखर तीनवेळा तर वीसपेक्षा अधिक गडकिल्ले सर केले आहेत. पंढरपूर ते अक्कलकोट व पुढे तुळजापूरपर्यंत त्याने सायकलसफर करून कोरोना महामारी, पर्यावरण बचाव तसेच सुकन्या समृध्दी योजनेबाबत जनजागृती केली. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला रायगड किल्ल्यावर पोवाडा गाण्याचा मान मिळाला होता. देवांशूच्या कमी वयातील कार्यकर्तृत्वाबदलद्दल तसेच वक्तृत्वाबद्दल उत्कृष्ठ बाल वक्ता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. रविवारी तो उस्मानाबादेत दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तेली समाज संघटनेच्यावतीने रवी कोरे आळणीकर यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी लक्ष्मण निर्मळे, महादेव मेंगले, चंद्रकांत मेंगले, प्राचार्य डॉ. अनिल देशमाने, प्रा. चंद्रशेखर राऊत, दादासाहेब घोडके, दतात्रय बेगमपुरे आदी उपस्थित होते. 


 
Top