उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मांडज व नारंगवाडी येथे  रविवारी (दि.२) रोजी येळवस जेवणासाठी शेताकडे गेल्याचा अंदाज घेऊन अज्ञात चोरट्यानी भर दिवसा घर फोडी करून दहा लाख रुपयाची सोन्याची दागिने वं दोन लाख रुपये रोख चोरून नेले आहे या बाबत रात्री उशिरा पर्यत पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

     यांची ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील मांडज येथीलं  बाळासाहेब गायकवाड, यांच्या घराचें कुलूप तोडून कपाटात ठेवलेले  एक तोळा सोने वं अन्य साहित्य तर  महेश पाटील यांच्या घरातील रोख वीस हजार  वं विलास पाटील यांच्या घरातील  पाच हजार रुपये वं साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहेत. तर नारंगवाडी येथील प्रदीप मुगळे यांच्या घरातील कपाताट ठेवलेले नऊ तोळे सोने सोन्याचे दागिने आणि  70 हजार रुपयेचीं रोकड वं  सचिन पवार वं नितीन पवार यांच्या घरातून जवळपास 15 तोळे सोने वं साधारण एक लाख रुपये असे एकूण अंदाजे 25 तोळे सोने आणि रोख दोन लाख एकूण 10 लाखाचा ऐवज  वं दोन लाख रुपये अज्ञात चोरट्या नी चोरून नेले आहे


 
Top