उमरगा/ प्रतिनिधी-

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी ( दि . ३१ ) मध्यरात्री एकूरगा शिवारातील एका बेकायदा डॉन्स बारवर छापा मारला . याप्रकरणी पाच पुरुषांसह चार महिला नृत्यांगणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकुरगा शिवारातील चौरस्ता ते लातूर शहराकडे जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला महेश दिगंबर सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये विक्रम माने , एका नवनाथ माने , ज्ञानोबा फुगटे , अमोल माने ( सर्व रा . माडज , ता . उमरगा ) , विक्रम पवार ( रा . उमरगा ) यांनी मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीमवर हिंदी गाणे सुरू केले होते . यावेळी स्टेजवरील अश्लिल बिभत्स हावभाव करत नृत्य करत असलेल्या नृत्यांगणावर नकली नोटा उडवत असताना हे सर्वजण आढळून आले . तसेच त्या व्यक्तींजवळ विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारु आणि बियर सुद्धा आढळून आली आहे . पोलिसांनी बेकायदेशीर दारूसह म्युजिकल साऊंड सिस्टीमचे साहित्य व रोख रक्कम असे आहे . एकुण एक लाख , सात हजार ८५५ रुपयांचे साहित्य जप्त केले उपविभागीय पोलिस अधिकारी आर . एस . बरकते , पोलिस कर्मचारी माधव बोईनवाड , गरड , बिराजदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे . दरम्यान , बोईनवाड यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम , साथीचे रोग अधिनियम १८ ९ ७ चे कलम ३ आणि महिलांच्या अश्लील नृत्यास प्रतिबंध घालणे आदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस . बी . कवडे करीत आहेत .

 
Top