उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केरळ राज्यातील कलिकट येथे आयोजित केलेल्या पहिल्या नौकायन स्पर्धेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील राघूचीवाडीचा आयर्न करवर पहिला आला आहे.

 कलिकट केरळ मध्ये पहिली नौकायान चॅम्पीयनशीप आयोजीत करण्यात आली होती ही स्पर्धा २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ घेण्यात आली. स्पर्धेमध्ये  महाराष्ट्र,गुजरात, तेलंगणा, केरळ, गोवा या राज्यातून १८ वर्षा आतील (ज्युनियर) नाविक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उस्मानाबाद येथील राघुचीवडी या गावातील  आर्यन विनोद करवार (वय ११ वर्ष) याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच  या वयोगटातून सर्वात ज्यास्त ४ पारितोषिक घेण्याचा मान  मिळवला आहे. 

 
Top