उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 26 जानेवारी रोजी साजरा करावयाच्या प्रजास्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाची तयारी जबाबदारीने करणे आवश्यक आहे.त्यामुळे आयोजन नेटकेपणाने आणि कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन करून करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी  दिले.

 प्रजास्ताक दिनाच्या पूर्व तयारीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले-डंबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेंव्हा त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी महेद्रकुमार कांबळे, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीन दाताळ,नगर परिषद मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, जि.प.चे शिक्षणधिकारी (मा.) गजानन सुसर, सार्वजनिक बांधकाम विभाग उप विभागीय अभियंता गपाट व्ही.एन, तहसीलदार गणेश माळी,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक विजय चिंचाळकर, महावितरण चे कार्यकारी अभियंता आर.आर.महाव्दार,उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संजय नकाते,शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.ना.सु.गंगासागरे आदी उपस्थित होते.

 प्रजास्ताक दिनाचा हा सोहळा शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाईल.तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल,तर मध्यवर्ती प्रशासकीय  इमारतीच्या प्रागणात सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.

  दरवर्षी प्रमाणे विविध विभागांना ठरवून दिलेली कामे वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, पोलीसांचे संचलन घेऊ नये. आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात नागरिकांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्यावी, असे आवाहन श्रीमती आवले-डंबे यांनी यावेळी केले.

 
Top