वाशी/ प्रतिनिधी-
येथील अजिंक्य प्रा.इं.मे. स्कूल मधील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी मध्ये यश संपादन केले. यामध्ये कु. सार्थक शरद पितळे – ८४% गुण, कु. तनिष्का संतोष शिंदे – ८२% गुण प्राप्त करून हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. शाळेचे संस्थापक एस.एल. पवार सर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी मु.अ. लक्ष्मिकांत पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.