उस्मानाबाद/ प्रतिनिधी - 

महाराष्ट्राचे  पाटबंधारे व गृहखात्याचे माजी मंत्री  डॉ पदमसिंह पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. डॉ पदमसिंह पाटील उपचारसाठी मुंबई येथील तेरणा रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ पाटील यांचे पुत्र तथा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत माहिती दिली  संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

डॉ.साहेब यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे त्यांची प्रकृती चांगली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारीसाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.अशी माहिती आमदार राणाजगजितिसंह पाटीलयांनी फेसबुक पेज च्या माध्यमातून दिली आहे. 


 
Top