कळंब  / प्रतिनिधी-

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने दि.१४ जाने २०२२ रोजी कळंब शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयास  स्मारक समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी स्मारक समितीचे माजी नगरसेवक सुनिल गायकवाड, लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, आरपी आय आठवले गटाचे मराठवाडा सचिव बंडू बनसोडे,जिल्हा संघटक मुकुंद साखरे,तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट,सामाजिक कार्यकर्ते कैलास जावळे,वंचितचे प्रा.अरविंद खांडके, भाजपचे सतपाल बनसोडे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अविनाश घोडके,प्रमोद ताटे,नागेश धिरे,दिलीप कसबे,संकेत धावारे आदींची उपस्थिती होती.

 
Top