उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील  निळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी गटनेते व जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धूरगुडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यावेळी मुख्याध्यापक श्री शिवाजीराव जाधव यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल विचार मांडले.

त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका यांनी शाळेतील प्रयोग शाळेला भेट देवून पाहणी केली त्यावेळी विज्ञान शिक्षक श्री बबन गोरे सर यांनी त्यांना माहिती सांगितली.त्यानंतर काकांनी शाळेचा परिसर स्वतः फिरून पाहिलं त्यावेळी मुख्याध्यापक  शिवाजीराव जाधव  आणि शिक्षक नेते  पवन सुर्यवंशी यांनी शाळेला संरक्षक भिंतीची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यावर काकांनी सांगितले की मी स्वतः उद्या या गोष्टीवर पाठपुरावा करून आपल्याला पोहच देतो व प्रयत्न करतो.

त्यावेळी शाळेतील शिक्षक  राजेंद्र सुतार, बबन गोरे ,  प्रकाश जाधव,  गोविंद नांदे,  शिवानंद धाम गुरुलिंग धावणे ,  पवन सुर्यवंशी सर,  बसवेश्वर पराकले सर व  शुभदा कुलकर्णी या उपस्थित होते.

 
Top