तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळेदिनी शुक्रवार दि.१४ रोजी  जलयाञा  मिरवणुकीचा सोहळा  पारंपरिक सोहळा  मोठ्या उत्साहात पार पडला . बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता आबाल वृद्ध , महिलाही या जलकुंभाच्या मिरवणुकीत सामील झाल्या होत्या . शुक्रवार पापनाश तिर्थकुंडातील पविञ जल व इंद्रायनी देविचे पुजन यजमान सौ. व श्री. मंजुषा प्रविण कदम या दाम्पंत्यांचा हस्ते करण्यात आले.

यावेळी मंहत वाकोजीबुवा , श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे,  जि.प.उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील,  धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे उपस्थितीत होते.  नंतर  सकाळी ७ वा . कुमारीका सुवासनी  जलकुंभ घेवुन या मिरवणूकीत सहभागी झाल्या. या मिरवणुक अग्रभागी पारंपारिक वाद्य नंतर सजविण्यात आलेल्या वाहनावर शाकंभरी देवि प्रतिमा ठेवुन त्या प्रतिमेस सर्व हिरव्या पालेभाज्या असलेल्या भाजा फळांचे हार घातला होता. 

 संबळाच्या कडकडाटात व आई राजा उदोऽ जयघोषात कुंकवाची उधळण करीत ही मिरवणूक छञपती शिवाजी महाराज पुतळा भवानी रोड मार्ग महाध्दार चौकातुन मंदिरात  पोहोचली. येथे श्री तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आल्यानंतर जलकुंभातील जलाने मंदीर स्वच्छ करण्यात आले नंतर जलयाञेत सहभागी कुमारीका यांचा यजमान श्री व सौ मंजुषा प्रविण कदम, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे,  धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे , सिध्देश्वर इंतुले, विश्वास परमेश्वर, राजकुमार भोसले,  अनील चव्हाण,  विशाल रोचकरी, पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो,  विशाल सोंजीसह सेवेदार मानकरी उपस्थितीत होते.

 नंतर देविजीस यजमानांचे सिंहासन अभिषेक पुजा करण्यात आल्या नंतर देविजीस वस्ञोलंकार घालुन धुपारती करण्यात आली, शाकंभरी देविची मंगलआरती यजमान प्रविण कदम यांच्या हस्ते करण्यात आली नंतर देविजींचा सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली . या नवरा महोत्सवाची सांगता येत्या रविवारी ( ११ जानेवारी ) घटोत्थापनेने होत आहे .

 
Top