उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

माजी नगराध्यक्षाने पत्रकार परिषद घेऊन पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास केल्याचे सांगितले.या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या उजनी पाणी प्रश्नाबाबत सांगितले व श्रेय घेण्याचा प्रयत्न केला हे हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी केली आहे. 

शहरातील मोकळ्या जागेत किती वृक्षारोपन केले. केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू असलेल्या एलईडी या उपक्रमात आपले काय योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात कोवीड हॉस्पीटलचे काय झाले.शहरातील वक्फ बोर्डाच्या जागेवर विकास कामे केली का ? मध्यवर्ती ठिकाण असलेले नाट्यगृह अद्याप सुरू का नाही ? शहरातील नागरिकांच्या मालमत्ताकरात वाढ का ? करण्यात आली.शहराच्या सौदर्यांत भर टाकणारे उद्याने का निर्माण केली नाहीत ? भाजच्या कार्यकाळात उस्मानाबाद न.प.ला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. न.प.मध्ये राबविलेल्या स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, अटल जलजीवन मशिन अशा अनेक योजना केंद्रात सत्तेत असणाऱ्या योजना भाजपने राबविल्या आहेत. त्याच्या आर्शिवादानेच न.प.स भरघोगस निधी मिळाला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांचे योगदान काय ? अशी टीका माजी  उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी केली आहे. 


 
Top