परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील वाकडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत अरविंद रगडे व दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा विकास पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले. त्याबद्दल आ.सुजितसिंह ठाकूर यांनी “संवाद” निवासस्थानी नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

     यावेळी अरविंद (बप्पा) रगडे, दिपक (भाऊ) पाटिल, पांडुरंग सावंत, विश्वास पाटील, ह.भ.प. गोपीनाथ बानगुडे महाराज, रघुनाथ बानगुडे, अरूण पाटिल, कुमार सातपुते, आश्रुबा पाटिल, अनिल पाटील, अनिल  रगडे, हनुमंत हांडे, सादु निकाळजे, राजाभाऊ रगडे, अशोक रगडे, सतेश पालके, सुनिल पाटिल तसेच गावातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top