तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या  मोफत मोतीबिंन्दू तपासणी शिबीरात ५१ रुग्णांची तपासणी करण्यात येवुन यातील दहा जणांनवर शस्त्रक्रिया रोटरी नेञ रुग्णालय उस्मानाबाद येथे करण्यासाठी  त्यांची नोंदणी घेण्यात आली.

या शिबीराचे उद्घाटन अप्पासाहेब पाटील व  रामचंद्र गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात रोटरी नेञरुग्णालयाचे डाँ. दत्ता वळेकर, डाँ. शिवरुद्र इसाके यांनी रुग्णाची तपासणी केली. यातील ३० जणांची तपासणी करुन त्यांना चेष्मा नंबर देण्यात आले. १० जणांना तीन महिन्या नंतर मोतीबिन्दू आँपरेशनसाठी बोलविण्यात आले तर १० जणांनवर  दोन दिवसात मोतीबिन्दू आँपरेशन करण्यासाठी उस्मानाबादला बोलविण्यात आले आहे.

यावेळी रोटरीचे भरत जाधव, सुधीर शेळके, अँड.अमोल गुंड, सुजित नाईक, संजय जाधव, प्रशांत अपराध, सदानंदराव विष्णू, अंबर कुंदन,   स्वप्नील कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

 
Top