उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पिक विमा प्रजासत्ताक दिना पुर्वी  न दिल्यास  पालकमंत्री  आमदार व खासदारांना जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही , असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलं  आहे की, आमचा हक्काचा फळ बागा , सोयाबीन सह इतर पीकांचा वीमा अद्याप पर्यंत मिळाला नाही आम्ही वारंवार आपणासह पालकमंत्री यांना याची वारंवार माहिती देऊनही आपल्या वीमा कंपनीच्या साटेलोटयामुळेच मग्रूर असलेल्या वीमा कंपनीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत आता संपला असुन आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा संपली आहे.   जर आमचा वीमा प्रजासत्ताक दिनाच्या आधी आमच्या बॅंकेत जमा न झाल्यास आम्हाला नाइलाजाने लोकप्रतिनिधीना जिल्हयात येवु देणार नाही. दरम्यान  यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्याला सरकार व प्रशासन हे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

हे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना  जिल्हाध्यक्ष  रविंद्र इंगळे  उपाध्यक्ष धनाजी पेंदे, नेताजी जमदाडे,  दुर्वास भोजने, राजाभाऊ हाके यांनी दिले.


 
Top