तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे मुख्य यजमान प्रवीण कदम व पत्नी मंजुषा कदम यांनी तहसीलदार कोल्हे यांचा सत्कार केला. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव ३ ते १८ जानेवारीदरम्यान साजरा करण्यात आला.

या नवरात्र महोत्सवात देवीच्या मंचकी निद्रेपासून ते घटस्थापना, देवीच्या अलंकार पुजा, दररोज रात्री छबिना मिरवणूक व शेवटी होमकुंडात पूर्णाहुती आदी सर्व धार्मिक विधी शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणे साजरे करण्यात येत असतात. नवरात्र महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याला धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, श्रीकांत कदम, अभियंता राजकुमार भोसले, अनिल चव्हाण, प्रवीण अमृतराव, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, रवि गायकवाड, उपस्थित होते.

 
Top