उस्मानाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू झाली असून सोमवारी दि. 24 जानेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या संपूर्ण कालावधीत 164 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून मंगळवार दि. 25 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ मे 2020 मध्येच संपला होता. परंतु कोरोना महामारी व अन्य कारणामुळे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाकडून अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 18 ते 24 जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे, 25 जानेवारी दाखल अर्जाची छाननी, 27 जानेवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. 20 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीयद़ृष्ट्या जिल्ह्याचे महत्वाचे सत्ताकेंद्र म्हणून जिल्हा बँकेकडे पाहीले जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी डीसीसी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी 372 अर्जाची विक्री झाली होती. सोमवारअखेर दि. 24 जानेवारीपर्यंत 164 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नागरी बँका, पतसंस्था, पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून सुरेश देशमुख, सतीश दंडनाईक, श्रीधर भवर, नारायण नन्नवरे, सुरेश बिराजदार, लक्ष्मण पडवळ, राजकुमार माने, राहुल पडवळ, सुधीर पाटील, सखाराम यमगर, विक्रम पाटील, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून सुभाष पाटोळे, कैलास शिंदे, संजय कांबळे, शंकर वाघमारे, आदिनाथ पालके, राजेंद्र शेरखाने, प्रदिप घोणे, विशाल शिंगाडे, इतर शेती संस्था मतदारसंघातून सतीश दंडनाईक, नारायण नन्नवरे, विक्रम सावंत, शिवाजीराव पाटील, संजय देशमुख, देवीदास भोसले, बिलाल तांबोळी, रामराजे पाटील, हर्षवर्धन चालुक्य, विशाल शिंगाडे, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून पुष्पाताई सुभाष मोरे, प्रविणा हनुमंत कोलते, सिंधुबाई सोमनाथ बोंदर, दिपाली रामराजे पाटील, मिनाक्षी भालचंद्र नेटके, मेघा धनंजय मोरे, उषा उत्तमराव टेकाळे, इंदुमतीबाई सुदनराव पाटील, दैवशाला संजय पाटील, अंजली श्रीकांत भालेराव, प्रतिभा शिवाजी पाटील, कुसूम बंडोबा चौधरी, मोहिनी पांडुरंग उंदरे, अर्चना गोकुळ शेळके, सुवर्णा मनेष सोनकवडे, अपेक्षा प्रकाश आष्टे, मंगल रामेश्वर भगत, निता महेंद्र धुरगुडे, अलका दयानंद भोसले, जयश्री हनुमंत भुसारे, सुवर्णा राजाराम कोळगे, संगीता सुरेश नाईकनवरे, मिनाक्षी प्रल्हाद शिंदे, कमल राजेंद्र गोरे, सुरेखा तानाजी गायकवाड, सुनिता माणिकराव पाटील, संगीता सुहास पाटील, विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून बापूराव पाटील, (उमरगा तालुका), पंकज स्वामी (उमरगा तालुका), जयश्री सुधाकर थिटे (उमरगा तालुका), महादेव माळी (उमरगा तालुका), ओंकार नाईकवाडी (उस्मानाबाद तालुका), सतीश दंडनाईक (उस्मानाबाद तालुका), नानासाहेब व्यंकटराव पाटील (उस्मानाबाद तालुका), चंद्रकांत कदमपाटील (उस्मानाबाद तालुका), नितीन भोसले (उस्मानाबाद तालुका), तानाजी जगदाळे (उस्मानाबाद तालुका), रियाज गफूर शेख (उस्मानाबाद तालुका), शिवाजी नाईकवाडी (उस्मानाबाद तालुका), सुरेखा तानाजी गायकवाड (उस्मानाबाद तालुका), जयसिंग वीर (उस्मानाबाद तालुका), वैभव मुंडे (कळंब तालुका), श्रावण सावंत (कळंब तालुका), सिंधुबाई बोंदर (कळंब तालुका), बजरंग शिंदे (कळंब तालुका), बळवंत तांबारे (कळंब तालुका), अजय समुद्रे (कळंब तालुका), शिवाजी कापसे (कळंब तालुका), जगन्नाथ गवळी (तुळजापूर तालुका), सुनील चव्हाण (तुळजापूर तालुका), विक्रमसिंह देशमुख (तुळजापूर तालुका), ज्ञानेश्वर  पाटील (परंडा तालुका), रणजीत पाटील (परंडा तालुका), रेवणनाथ ढोरे (परंडा तालुका), नेटके भालचंद्र (परंडा तालुका), धनंजय मोरे (परंडा तालुका), मारुती मासाळ (परंडा तालुका), मधुकर मोटे (भूम तालुका), नागप्पा पाटील (लोहारा तालुका), दिपक जवळगे (लोहारा तालुका), विजय लोमटे (लोहारा तालुका), राहुल पाटील (लोहारा तालुका), रणजित गायकवाड (वाशी तालुका), विक्रम सावंत (वाशी तालुका), ताराचंद डुंगरवाल, वसंत मोरे (वाशी तालुका), सचिन इंगोले (वाशी तालुका), दादाराव शिंदे (वाशी तालुका), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून विजय शिंगाडे, नवनाथ राऊत, त्रिंबक कचरे, नितीन गाढवे, पांडुरंग कुंभार, हरिचंद्र कुंभार, अनंत वाघमारे, प्रकाश आष्टे, महेबूबपाशा पटेल, दिलीप म्हेत्रे, बिलाल तांबोळी, विमुक्त जाती/भटक्या जमाती मतदारसंघातून समर सोनटक्के, सिंधुबाई बोंदर, सुभाषसिंह सिद्दीवाल, सुदन पाटील, संजीव पाटील, वैभव मुंडे, मारुती मासाळ, रामहारी मुंडे, सुनील शेंडगे, दिलीप गरुड, अशीवंत श्रीनामे, भारत डोलारे, बालाजी गावडे आदींचा समावेश आहे.

 
Top