उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आ.राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली  भाजप कार्यालय उस्मानाबाद ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची (प्रतिमेची) गाढवावरून धिंड काढून घोषणा देत निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी  देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्या बद्दल अपशब्द वापरुन बदनामी केली होती. त्यानंतर देशभरात त्यांच्या ‍विरोधात निदर्शने, आंदोलने करुन त्यांच्या अटकेसाठी विविध ठिकाणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. काल नाशिक येथे नाना पटोले यांनी आणखी एकदा खालच्या स्तरावर जावुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. त्याचा निषेध म्हणुन आज सबंध महाराष्ट्रासह धाराशिव जिल्हयात ही नाना पटोले यांच्या प्रतिमेची गाढवावरुन धिंड काढुन निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी भाजपाचे राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, राहुल काकडे, ललिता जाधव, अर्चना अंबुरे, पूजा राठोड, प्रवीण सिरसाठे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, विनायक कुलकर्णी, पांडुरंग लाटे, अभिराम पाटील, ॲड. कुलदीपसिंह भोसले, राहुल शिंदे, ओम नाईकवाडी, नरेंद्र वाघमारे, संदीप इंगळे, प्रीतम मुंडे, पपिन भोसले, सुजित साळुंके, सूरज शेरकर, विनोद निंबाळकर, सुनील पांगुडवले, प्रसाद मुंडे, हिम्मत भोसले, गणेश एडके, सलमान शेख, सागर दंडणाईक, गिरीष पानसरे, स्वप्नील नाईकवाडी, अमोलराजे निंबाळकर, शाम तेरकर, अतुल चव्हाण, जगदीश जोशी, मेसा जानराव, रोहित देशमुख,  गणेश इंगळगी, पंकज जाधव, यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे तसेच महिला मोर्चाचे असंख्य पदाधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते.

 
Top