तुळजापूर / प्रतिनिधी-

शासकीय आकडेवारीनुसार प्रत्येक मंडळातील ज्या पद्धतीने नुकसान झालेले आहे. त्यानुसार त्या टक्केवारीत जर विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना  जिल्ह्यात  तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा संपर्क कार्यालयांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सर्व शेतकरी  यांच्या  झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे  जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत  खरीप हंगामातील पीक विमा या संदर्भामध्ये पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी जिल्हा बैठक संपन्न झाली. यामध्ये विमा कंपनीने तालुक्यातील तहसील मंडळातील पिक विमा वाटप न केल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ठिकाणी विमा कंपनी आणि तालुक्यातील विमा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून अहवाल तयार करून विमा कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा फायदा केला आहे 

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून प्रत्येक शेतकऱ्याने तक्रार देऊन सुद्धा त्याची कसलीही पाहणी न करता चुकीच्या पद्धतीने अहवाल केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पिक विमा मिळत आहे शासकीय आकडेवारीनुसार प्रत्येक मंडळातील ज्या पद्धतीने नुकसान झालेले आहे. त्यानुसार त्या टक्केवारीत जर विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला  

यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष धनाजी पेंदे, चंद्रकांत समुद्रे, शशिकांत चव्हाण, कमलाकर पवार, उत्तरेश्वर आव्हाड, सचिन पाटील, विष्णू काळे, पंकज पाटील, कमलाकर पवार, दयानंद भोसले, श्रीकांत पाटील, भोजने प्रदीप, जगदाळे, सचिन पाटील, रामकृष्ण पाटील, शहाजी सोमवंशी, बाजीराव पाटील, नेताजी जमदाडे , उमेश जामदाडे, गव्हाळ महादेव व  शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top