विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून आश्वासन दिल्याची दुधगावकर यांची माहिती


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकर्‍यांना त्वरीत सरसकट विमा मिळावा, यासाठी आपण बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीविरोधात निदर्शने, रास्ता रोको, आंदोलन केली होती. तसेच येत्या 6 ते 10 डिसेंबर कालावधीत मुंबई येथील विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे तात्काळ विमा कंपनीच्या उस्मानाबाद येथील प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क साधून शेतकर्‍यांच्या मागण्याबाबत प्रक्रिया सुरु असून दोन दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे मिळतील, असे सांगून त्याबाबतचे पत्रही दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून करण्यात आले होते. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकर्‍यांना विमा मंजूर केलेला नाही. मागील वर्षाच्या विम्याची राहिलेली रक्कम आजपर्यंत शेतकर्‍यांना दिलेली नाही. शेतकर्‍यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या पैशाच्या विरुध्द फौजदारी खटले दाखल केलेले नाहीत. सदर विमा कंपनी काळ्या यादीत टाकावी, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने दुधगावकर यांनी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.26) रास्ता आंदोलन केले होते. यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती. तसेच त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे. येत्या 6 ते 10 डिसेंबर कालावधीत मुंबई येथील विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेवून विमा कंपनीच्या उस्मानाबाद येथील प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यात त्यांनी मुंबई येथे 2 डिसेंबरला कृषीमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. त्यानुसार पेमेंटची पुर्तता करण्यासाठी प्रक्रिया सुरु असून येत्या दोन दिवसात शेतकर्‍यांना पैसे मिळतील, असे आश्वासन दिले आहे.   त्यामुळे विमा कंपनीविरोधातील आंदोलनास एकप्रकारे यश आले आहे.

ठरल्याप्रमाणे न झाल्यास टाळे ठोकरणार : दुधगावकर

विमा कंपनीकडून दोन दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दोन दिवस आनखी वाट पाहणार, त्यानंतर ठरल्याप्रमाणे मुंबई येथील विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर यांनी दिली आहे. 


 
Top