तुळजापूर (प्रतिनिधी )

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने महाराष्ट्राचे  चीफ जनरल मँनेजर अजयकुमार सिंग यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन, श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानला ९१हजार रुपयाची  देणगी तसेच दोन इलेक्ट्रॉनिक रिक्षा, ९ वाँटर कुलर, १ अँरो प्लाँट मंदीर संस्थानला देणगी म्हणून िदला आहे. 

श्री अजय कुमार सिंग, (चीफ जनरल मॅनेजर महाराष्ट्र,) पत्नी नम्रता सिंग हे श्री देवीच्या दर्शनाला आले होते.  यानिमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, अकोला श्रीनिवास इस देपुटी,जनरल मॅनेजर, श्री विलास शिंदे,   श्री निखील लिमकर,  , पुजारी सचिन परमेश्वर व इतर एसबीआय बँक कर्मचारी आदी उपस्थित होते.


 
Top