उस्मानाबाद (प्रतिनिधी )

प्रितम मुंडे विचार मंचच्या वतीने प्रभाग क्र.6 मधील नागरी समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन नगरपालिकेचे सीओ हरिकल्याण यलगट्टे यांना देण्यात आले आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  बार्शी नाका  ते  बोंबले  हनुमान  रोड  वरील नागरिक “ धुळी” मुळे  हैराण झाले आहेत.  गेली 5 वर्षात या भागात कसलाही विकास झाला नसून स्वच्छते च्या बाबतीत नगरपालिका धिम्म झाली आहे. मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी नागरिकांच्या दारात येत असून शेकडो नागरिकांना रोगराईला सामोरे जावा लागत असल्याने नगरपालिका यावर उपाय काढेल का हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.या वेळी परिसरातील त्रस्त नागरिकांनी व महिलांनी आक्रमक पवित्रा घेत निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाही नाही झाली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

 यावेळी उप नगराध्यक्ष अभय इंगळे नगरसेवक, शिवाजी पांगुडवाले, नगरसेविका राणीताई पवार, जयश्री  शिंदे, सौ.सिमा  जगताप, सौ सुवर्णा  औटी,सौ. शिंदे शैलजा,सौ, रेखा  मोरे,पाठक. एस. डि,सौ. लता भालेराव,सौ. वनमाला पोळे, सौ. मीनाक्षी  मोहिते,सौ. मनिषा मासाळ, सौ.पल्लवी  जगताप, सौ.सविता महाडिक, सौ. मनिषा  खोत,श्रीमती रावळे रजनी रंगनाथ,सौ.शोभा विठ्ठलदास, श्री राजेंद्र गुरव,सौ. अनुजा  मोरे,श्री. भगवान ढेकणे,सौ. रेखा   डुकरे,श्री क्षीरसागर पी. डि आदी जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.



 
Top