परंडा/प्रतिनिधी   -  

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा  गे  शिंदे महाविद्यालयाच्या व उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पठाण अब्रार, मकरंद वांबुरकर ,रवींद्र करपे, तानाजी गुंजाळ ,विक्रम वाघ, अंशू दत्तात्रय व सुधीर मस्के यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण ,प्रा सचिन साबळे यांनी एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त या रॅलीचे आयोजन केले होते .यावेळी महारॅली चे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी आरोग्य विषयी व एड्स जनजागृती या विषयी मार्गदर्शन केले तर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे ही रॅली पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी प्रास्ताविक व सूत्रसंचालन मकरंद भांबुरकर यांनी केले .प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डॉ सचिन चव्हाण यांनी आभार मानले .या प्रसंगी डॉ अक्षय घुमरे , प्रा गोरेपाटील अमर, डॉ प्रकाश सरवदे, डॉ सचिन चव्हाण, प्रा साबळे सचिन यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. 

 
Top