उमरगा / प्रतिनिधी-

 विश्वरत्न बौधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी (दि ०६) पालिके समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.प्रारंभी गुणरत्न भालेराव यांनी त्रिशरण, पंचशील घेतले. यावेळी कमलाकर सूर्यवंशी, श्रीधर सरपे, मिलिंद कांबळे, विश्वास सोनकांबळे, धीरज कांबळे यांच्यासह अनुयायांनी अभिवादन केले. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन करीत होते. पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे कैलास शिंदे, आरपीआयचे सुभाष सोनकांबळे, युवक कॉंग्रेसचे विजय वाघमारे, प्रभारी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, विवेक हराळकर, बळीराम पवार, वामन डावरे, तुळशीदास वऱ्हाडे, हरीश डावरे, वंचितचे राम गायकवाड, बाबूराव गायकवाड, ॲड हिराजी पांढरे, शहाजीराव मस्के, दिलीप सुरवसे, दत्तात्रय कांबळे, धीरज बेळंबकर, गौतम सूर्यवंशी, यादवराव जाधव,संतोष सुरवसे, चंद्रकांत कांबळे, मराठा सेवा संघाचे भास्कर वैराळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप जाधव,उमाजी गायकवाड यांच्यासह भीम अनुयायी,बहुजन समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. 

 
Top