उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील अर्थशास्त्र विभाग आणि कंज्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली . भविष्यातील गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कशा पद्धतीने केली पाहिजे या बाबतचे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून प्रा.इंदुमती गंगनावर व कंजूमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे मा. टी.आर. पांडे हे लाभले होते. या कार्यशाळेमध्ये बचत, गुंतवणूक आणि भविष्यातील तरतूद कशा पद्धतीने केली पाहिजे त्याच बरोबर ऑनलाइन ट्रांजेक्शन करत असताना संभाव्य धोके याबद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची उत्तरे त्यांच्या समस्या यांचे निराकरण करण्यात आले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जीवन पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक मारुती अभिमान लोंढे यांनी मानले ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांना ई-प्रमाणपत्र आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेली दोन ई -पुस्तके देण्यात आली.

 
Top