उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या 25 जानेवारी 2022 रोजी   राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. मतदारांना विशेषत नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे हा उद्देश आहे.देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविणे आहे .त्यासाठी मतदारांना  जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा  केला जातो. या दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते. हा दिन जिल्हाभरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  केले .

यावेळी बैठकीस निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार चेतन पाटील,कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किरण थोरात,प्राचार्य डॉ.जे.ई.जहागीरदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.पवार,माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी काझी टी.एफ, आकाशवाणी केंद्र प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे,  क्रिडा अधिकारी नदीम शेख आणि निवडणूक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top