तुळजापूर / प्रतिनिधी-

  तुळजापूर तालुक्यातील मुंबई - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी येथील टोलनाक्यावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वाढत्या अरेरावी व दादागिरी बाबत विचारपूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांची टोल कर्मचारी व अधिकारी यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि प्रशांत नवगिरे यांनी टोल फोडला .

 गेल्या अनेक दिवसांपासून या टोलनाक्यावरील कर्मचारी व अधिका-यांकडुन अणदूर, जळकोट, नळदुर्ग, फुलवाडी, धनगरवाडी व इतर अनेक जवळच्या गावातील वाहनधारकांना अपमानित केले जात होते . इतकेच नव्हे तर प्रत्येक वेळी पोलीसांना बोलावून वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . टोलकंपनीच्या जाचाला नागरीक व वाहनधारक कंटाळले असुन याबाबत जाब विचारत असताना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यां मध्ये बाचाबाची झाली आणि प्रशांत नवगिरे यांनी टोल कंपनीला धडा शिकविण्यासाठी मनसे स्टाईल खळ्ळ खटयाक आंदोलन करीत दहा टोल बुथ फोडले. टोलकंपनीच्या अधिकाऱ्यानी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नवगिरे यांच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   

 
Top