तेर / प्रतिनिधी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तेर येथील शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले

तेर ता. उस्मानाबाद येथे संयोजक नरहरी बडवे यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून गावातील विविध शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र संत विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करुन मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , एकात्मिक बाल  प्रकल्प आधिकारी जे.जी.राठोड  , जि .प.पेठ  प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. खडके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कला शिक्षक एस. टी. गांगुर्डे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , ए .बी .सोनटक्के , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top