तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील होत असलेल्या  काक्रंबा विविध कार्यकारी सोसायटी निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी तेरा जागेसाठी एकुण २९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २४ डिसेंबरला उमेदवार अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याने या दिवशी  या निवडणुकीचे चिञ स्पष्ट होणार आहे.

 विविध कार्यकारी सोसायटीची  निवडणुक 2011ला झाली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये  मुदत  संपली होती.त्यानंतर विविध कारणाने निवडणुक पुढी ढकलत गेली अखेर 2021च्या अखेरचा महिन्यात याला मुहुर्त लागला आहे. ही निवडणुक भाजप काँग्रेस  विरुध्द राष्ट्रवादी,काँग्रेस,  शिवसेना प्रणित आघाडीत होणार आहे. बुधवार दि. ८ रोजी छाननी होणार आहे तर २४ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. २ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे .

 
Top