तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हाचे पालकमंत्री  .शंकरराव गडाख  जिल्हा दौऱ्यावर असताना  ते उमरगाकडे  जाताना  नळदुर्ग येथे जिल्हाचे माजी पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धिरज पाटील, डि.सी.सी बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील विविध प्रश्नांवर संवाद साधला.

 यावेळी   श्री तुळजाभवानी  अभिषेक व खडीक्रेशर   सुरु करण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्री  शंकरराव गडाख यांनी  श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगांवकर यांना दुरध्वनीवरुन याविषयी सुचना दिल्या, यावर जिल्हाधिकारीनी लवकरच  तिन्ही पुजारी मंडळाना विश्वासात घेवून किमान दिवसातून दोन तासासाठी अभिषेक चालू करण्याबाबतीत विचार करण्याचे आश्वासन दिले  तसेच तुळजापूर तालुक्यातील  महसुल खात्याने छापा मारुन केलेले  सिल केलेले खडि क्रशर बाबतीत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढून चालु करण्यात येतील,असे आश्वासन दिले, अशी माहीती माजी आ. मधुकर चव्हान यांनी दिली.

 
Top