उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कोव्हिड-19 लढ्यात दारफळ (ता.जि. उस्मानाबाद) अग्रेसर ठरत आहे.पहिल्या डोस चे 18 वर्षांवरील व 45 वर्षांवरील दोन्ही वयोगटातील 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

सरपंच तथा युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी लक्ष घालुन सातत्याने लसिकरण मोहिम सुरू ठेवत 45 वर्षांवरील व 18 वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड या लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोस चे लसीकरण शिबिर वेळोवेळी आयोजित केले होते.ज्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेण्याचे टाळले होते व ज्यांच्या मनात लसीकरणाबाबत विनाकारण अफवांमुळे भीती बसली होती अश्या तब्बल 65  नागरिकांना चौका चौकात व घरोघरी जाऊन जागृती करण्यासोबतच त्यांची मानसिक तयारी करून जागेवरच पहिला डोस देण्यात आला. अशा प्रकारे दारफळ येथील पहिल्या डोस चे 18 वर्षांवरील व 45 वर्षांवरील दोन्ही गटांतील 100 टक्के लसीकरण पूर्ण करून घेण्यात आले आहे. दुसऱ्या डोस चे ही 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित नागरिकांसाठी आरोग्य उपकेंद्र,दारफळ येथे   लसीकरण सुरू आहे. यानंतरही  सातत्याने लसीकरण मोहीम राबवून  दुसऱ्या डोस चे ही लसीकरण 100 टक्के पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याचे सरपंच तथा युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी सांगितले. सदर लसीकरण मोहीम राबवत असताना जिल्हा आरोग्य प्रशासनाचे, समुद्रवानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काकडे,आरोग्य उपकेंद्र,दारफळ चे आरोग्य समुदाय अधिकारी प्रजित गायकवाड, आरोग्य सेवक सुलाखे, आरोग्य सेविका जाधव, आशा सेविका सारिका ओव्हाळ, चव्हाण आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

 
Top