उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथे   दिनांक 10 डिसेंबर-2021 रोजी  हनुमंत गरड यांच्या शेतात तूर सिता 95 या वाणाची पीक पाहणी कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष  जानन बंगाळे पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या उपस्थितीत आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तूर सिता -95 पीक पाहणी कार्यक्रम पार पडला,यावेळी धनाजी पेंदे, धर्मराज पाटील, रामकृष्ण पाटील, आबा पाटील राजेंद्र धनके,अमोल मते, विक्रम मगर,पांडुरंग मगर, दुर्वास भोजने, नेताजी जमदाडे, प्रदीप जगदाळे, संतोष भोजने,रतनेश गाटे, शहाजी सोमवंशी, राजेभाऊ हाके,तानाजी पाटील,शाहजी नाईकनवरे,दिनेश दादा पाटील, गुंडापा गाजरे, शांताराम पेंदे,यांच्यासह  पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top