उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांच्या आदेशाने राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. त्या दृष्टीने १२ ते १७ डिसेंबर २०२१ दरम्यान “राज्यस्तरीय महा रोजगार मेळाव्याचे” आयोजन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे. नववी पास पासून दहावी आणि बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह सहभागी होण्यासाठी या आयुक्तालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील साधारणत: किमान २५ हजार रिक्त पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


 
Top