उमरगा  / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुबंई यांच्या मार्फत  एफ्रिल 2021 मध्ये घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत उमरगा येथील श्राविका कांबळे यांनी उज्वल यश संपादन केले आहे.  येथील नानजकर स्मारक संगीत विद्यालयांच्या केंद्राअंतर्गत कै. रामनप्पा हरणाळकर स्मारक संगीत विद्यालय, स्वर साधना संगीत क्लास मधील मध्यमा पूर्ण परीक्षेस बसलेल्या  श्राविका कांबळे या विध्यार्थिनींने मध्यमा पूर्ण गायन विषयात प्रथम क्रमांक मिळविला तर हर्मोनियम वादनात वैभव कोकणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. अल्केश कांबळे यांनी गायनात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

या परीक्षा केंद्रात एकूण 26 विध्यार्थी परीक्षेत बसले होते त्यात प्रारंभीक करीता 14 विध्यार्थी होते, प्रवेशिका प्रथम करीता सहा विध्यार्थी बसले होते, प्रवेशिका पूर्ण परीक्षेस तीन विध्यार्थी होते तर मध्यमा पूर्ण या परीक्षेस  तीन विध्यार्थी बसले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संगीत शिक्षिका गौरी कांबळे,  दर्शन सुरवसे, नरसिंग पांचाळ,प्रा मुरली जाधव, केंद्र संचालक सोमशंकर आगसे,संतोष हारके,आदींनी अभिनंदन केले आहे

 
Top