उस्मानाबाद / प्रतिनिधी-
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाचे विभाजन करण्यात आले आहे. आता येथून केवळ उस्मानाबाद व बीड या दोनच जिल्ह्याचा कारभार होणार आहे. सर्व प्रकारची कार्यालये जिल्ह्यात आणून विकास करणे आवश्यक असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील कार्यालये अन्य जिल्ह्यात हलवण्याचा प्रकार होत आहे. मात्र, संबंधित नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपने ही फक्त पत्रक काढून आंदोलन करण्याऐवजी निषेध व्यक्त केला आहे. 
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय आहे. येथून उस्मानाबादसह लातूर व बीड जिल्ह्याचा कारभार सुरू होता. त्यामुळे िजल्हयाच्या विकास कामात गती होती परंतु, आता या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून लातूर जिल्हा वेगळा करण्यात आला आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर या तीन जिल्हयाचे सार्वजनिक बांधकाम विभगाचे अधिक्षक अभियंता कार्यालय उस्मानाबाद येथे असल्याुळे रेलचेल होती.  आता येथील कार्यालयाचे महत्त्व कमी झाले आहे. उस्मानाबाद जिल्हयाची सार्वजनिक बांधकाम मंडळ (अधिक्षक अभियंता कार्यालय) सरकारच्या नवीन आदेशानुसार विभाजीत करुन लातुर येथे नवीन मंडळ स्थापन केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापनेपासुन उस्मानाबाद येथेच आहे. चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळत असताना लातूरकरांच्या सोईसाठी का ? नांदेड येथील राजकीय लोकांच्या सोईसाठी हे विभाजन करण्यात आले आहे.या विषयी चर्चा चालू आहे.  जिल्ह्यात एक एक विभागाचे कार्यालय आणून विकासात भर घालणे गरजेचे होते, मात्र जिल्ह्यातील एक एक कार्यालय स्थलांतरित होत असताना लोकप्रतिनिधींचे मौन आश्चर्यकारक असल्याचे भाजपने म्हटले आहे.
 
Top