लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील नगरपंचायत निवडणूक मतदान दि.21डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नगरपंचायतच्या 4 जागा वगळून उर्वरित 13 जागेसाठी 44 उमेदवार निवडणूकीच्या रींगणात उतरले होते. शहरात 13 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान केंद्रावर सकाळी साडे सात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पुरुष 1779 पुरुष,1883 स्त्री असे एकूण 3262 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 67.07 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी दिली.

 
Top